PPE किट घालून काम करणं कितीSS कठीण आहे आहे, एकदा वाचा; आपण त्यांच्या जागी असतो तर? याची कप्लना करा...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

संख्या  PPE सूट घालून उपचार करणं वाटतं तितकं सोपं नाही..डॉक्टरांना होतोय प्रचंड त्रास तरीही बजावतायेत कर्तव्य....

मुंबई:  संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महाभयंकर संकटातून जात असताना डॉक्टर आणि आरोग्य सेवा देणारे कर्मचारी दिवसरात्र रुग्णांच्या उपचारासाठी झटत आहेत. याच डॉक्टरांच्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी PPE सूट तयार करण्यात आले आहेत. मात्र हे सूट सतत घालणं आणि रुग्णांवर उपचार करणं वाटतं तितकं सोपं नाही.

आलेल्या प्रत्येक रुग्णाची सेवा आणि उपचार करून त्याला बरं करण्याचं काम नेहमीच डॉक्टर करत असतात. म्हणूनच डॉक्टरांना आपण देव मानतो. मात्र या कोरोनाच्या काळात या डॉक्टरांचे प्रचंड हाल होतायेत तरीही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे PPE सूट देण्यात आले आहेत. हा सूट घातल्यानंतर डॉक्टर कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले तरी त्यांचं रक्षण होऊ शकतं. मात्र या सुटमुळे डॉक्टरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...

PPE सूट एकदा घातला कि तो ५-६ तास आगातून काढता येत नाही. या सुटसोबत शु कव्हर, ग्लोव्स, टोपी इत्यादी गोष्टीही असतात. तसंच हा सूट घातल्याने डॉक्टरांचं संपूर्ण शरीर झाकलं जातं. मात्र हा सूट एकदा घातल्यानंतर डॉक्टरांना ५-६ तास टॉयलेटसुद्धा जात येत नाही. काही डॉक्टरांना जोपर्यंत हा सूट अंगात आहे तोपर्यंत पाणीसुद्धा पिता येत नाही. शिवाय सध्या उन्हळ्याचे दिवस सुरु आहेत  हा सूट घातल्यानंतर हवा यायला जागा नसते. त्यामुळे शरीराला आतून प्रचंड घाम येतो. AC मध्ये कोरोना प्रचंड वेगात पसरतो त्यामुळे रुग्णालयातले AC बंद ठेवण्यात आले आहेत.

सध्या PPE सूटची प्रचंड कमतरता जाणवत असल्यामुळे हे सूट वारंवार बदलणं डॉक्टरांना शक्य होत नाहीये. मात्र स्वतःला कितीही त्रास होत असला तरी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हा त्रास सहन करूनही आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.   

check how difficult it is to work with PPE kit on in humid and hot weather


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: check how difficult it is to work with PPE kit on in humid and hot weather