आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात

आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात

मुंबई : युवा सेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर अधिक भर दिला होता. यादरम्यान त्यांनी स्वतः पालिका मुख्यालय आणि दादर परिसरात प्लास्टिक क्रशिंग यंत्र सुरू करत त्याचे उद्‌घाटनही केले होते; मात्र यातील काही यंत्रे बंद आहेत, तर काही चक्क बेपत्ता आहेत. 

आदित्य यांच्या पुढाकाराने मुंबईत प्लास्टिक क्रशिंग यंत्रे बसवण्याचा निर्णय दीड वर्षांपूर्वी घेण्यात आला. खासगी कंपनीच्या मदतीने सीएसआर फंडाचा वापर करत पालिका मुख्यालय आणि दादरमधील शिवाजी पार्क परिसरात दोन यंत्रे लावण्यात आली. पालिकेच्या माध्यमातून अशी 500 यंत्रे सुरू करणार असल्याची घोषणाही आदित्य यांनी उद्‌घाटनानंतर केली होती; मात्र तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता हे यासाठी फारसे उत्सुक नसल्याने हा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला.

पालिका मुख्यालयात लावण्यात आलेले यंत्र काही दिवसांतच गायब झाले, तर शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावरील शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आलेले यंत्र दीड वर्षांपासून बंदच आहे. बंद यंत्र आणि आदित्य यांच्या नावाचा फलकही तिथे तसाच आहे. आता तो परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. त्यामुळे पर्यावरणावर भरभरून बोलणाऱ्या आदित्य यांनी स्वतः सुरू केलेल्या प्रकल्पांची माहिती घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 

मनसेची खरमरीत टीका : 

पालिका आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षातील युवराजांचा हा 'ड्रीम प्रोजेक्‍ट' होता. मात्र त्यांनी उद्‌घाटन केल्यानंतर काही दिवसांतच यंत्र बंद पडली. त्याची माहिती आदित्य यांनी घेतलेली दिसत नाही. यावर आम्ही ट्विट करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता; मात्र काहीही फायदा झाला नाही. यावरून आदित्य यांना पर्यावरणाविषयी किती तळमळ आहे हे स्पष्ट दिसते, अशी खरमरीत टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली . 

WebTitle : dream project of aaditya thackeray gone for toss

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com