esakal | जाणून घ्या कशी कराल ऑनलाईन मद्याची ऑर्डर, परवान्यासाठी 'ही' आहे वेबसाईट...
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या कशी कराल ऑनलाईन मद्याची ऑर्डर, परवान्यासाठी 'ही' आहे वेबसाईट...

दारू दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं ऑनलाईन दारूविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी सशर्त असून ज्या ठिकाणी दारूबंदी आहे आणि जिथे अद्याप दारूविक्रीला परवानगी नाही,

जाणून घ्या कशी कराल ऑनलाईन मद्याची ऑर्डर, परवान्यासाठी 'ही' आहे वेबसाईट...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र या काळात राज्यातली आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकानं सुरु केली. पण दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहिल्यावर पुन्हा एकदा अनावश्यक सेवा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यानंतर महसूल मिळवण्यासाठी दारूची ऑनलाईन विक्री करावी अशी मागणी सुरु झाली. त्यानुसार आता मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता ऑनलाईन पद्धतीनं मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्री करता वाईनशॉप सुरु करण्याचा प्रयत्न फसला होता. सर्व उद्योगधंदे बंद असल्याने सर्वच महसूल मिळवायचा कसा, असा प्रश्न पडला. त्यानुसार राज्यात दारुची दुकानं सुरु करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यानं पुन्हा दारू विक्री बंद करावी लागली आहे.

मंगळवारी रात्री त्यांची कोरोना विरोधातली झुंज अपयशी ठरली आणि आणखी एका पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
 

ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी

दारू दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं ऑनलाईन दारूविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी सशर्त असून ज्या ठिकाणी दारूबंदी आहे आणि जिथे अद्याप दारूविक्रीला परवानगी नाही, अशा ठिकाणी ही ऑनलाईन दारू मिळणार नाही. 14 मेपासून म्हणजेच उद्यापासून सकाळी 10 वाजल्या पासून ही ऑनलाईन मद्यविक्री सुरु केली जाईल. ज्या जिल्हयात आधीपासून मद्यविक्री करण्यास परवानगी होती, त्याच जिल्हयात ही ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन मद्य विक्री करताना दुकानदारांना काही नियम आणि अटी शासनाने घालून दिल्या आहेत.

कशी कराल ऑनलाईन ऑर्डर 

 • मद्य मागणी करण्याऱ्या ग्राहकाकडे आवश्यक मद्यसेवन परवाना नसल्यास ते तो परवाना या विभागाच्या www.stateexcise.maharashtra.gov.in किंवा www.exciseservices.mahaonline.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन प्राप्त करु शकतील किंवा संबंधित दुकानदाराकडून विकत घेऊ शकतील. 
 • त्यानंतर ग्राहकाला त्यात आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करावं लागेल.
 • आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करा.
 • सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल.
 • त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकनं करावी.
 • व्यवस्थित माहिती नमूद केल्यानंतरच ग्राहकांना ई-टोकन मिळणार आहे.
 • मिळालेल्या टोकनच्या आधारे ग्राहकास घरपोच दारू मिळेल. 

महाविकासआघाडीतल्या मंत्र्यालाच शिवसेनेकडून 'हा' खोचक सल्ला

दारू घरपोच देण्यासाठी जी व्यक्ती जाईल, त्या व्यक्तिला मास्कचा वापर करणं अनिवार्य असेल. तसंच त्या व्यक्तीला वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करावं लागणार आहे. या सगळ्याची दक्षता दुकानदाराने घ्यायची आहे.

ऑनलाईन मद्य विक्री करताना छापील किंमत म्हणजेच MRP दरानेच मद्य विकलं जावे अशा सक्त सुचना उत्पादन शुल्क विभागानं दिल्या आहेत. राज्यातील 33 पैकी 21 जिल्ह्यात ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. तर 12 जिल्हयात ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आलेली नाही.

ऑनलाईन मद्यविक्रीचे नियम आणि अटी 

 • जिल्हा प्रशासनाने मद्य विक्रीस परवानगी दिलेल्या जिल्ह्यातच ऑनलाईन मद्य विक्री करता येणार आहे.
 • तुमचा जिल्हा जर रेड झोनमध्ये असेल तर त्या जिल्ह्यात मद्यविक्री होणार नाही. 
 • घरपोच मद्यसेवा देण्याची जबाबदारी सर्वस्वी दुकानदारावर असणार आहे.
 • घरपोच सेवा देणारे कामगार यांची वैद्यकीय तपासणी करुन ते वैद्यकीयदृष्टया पूर्णपणे पात्र ठरल्यासच त्यांना विभागातर्फे तसे ओळखपत्र देण्यात येईल.
 • संबंधित घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांना मास्क, हेड कॅप, हातमोजे, हॅन्ड सॅनिटायझर आणि वारंवार हातमोजे निर्जतुक करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईडचाचा वापर करणं अनिवार्य आहे.
 • घरपोच सेवा देणाऱ्या प्रत्येक दुकानात जास्तीत जास्त 10 कामगाराच काम करतील.
 • सरकारच्या आदेशानुसार सदयस्थितीत घरपोच मद्यसेवा ही कोविड-19 /लॉकडऊन कालावधीच करताच लागू असेल.
 • मद्य बाळगणे, वाहतूक करणे इ. मद्यसेवन परवान्यातील तरतूदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची संबंधित दुकानदारांनी दक्षता घ्यावयाची आहे.
 • सरकारचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणं दुकानदार, Delivary boy आणि ग्राहकास बंधनकारक असणार आहे. 

अनेकांना जे जमत नाही ते 'या' तीन वर्षांच्या कबीरने केलं, पोलिसांनाही वाटलं लै भारी

या जिल्ह्यात ऑनलाईन मद्यविक्री सुरू

ठाणे (फक्त ठाणे ग्रामीण भाग), पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, गोंदिया, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, भंडारा, यवतमाळ. 

या जिल्ह्यात मद्यविक्रीस मनाई

मुंबई, मुंबई उपनगर, लातूर, उस्मानाबाद, नागपूर, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, सातारा

मुंबई शहर रेड झोनमध्ये असल्यानं मुंबईतल्या मद्यप्रेमींची प्रतीक्षा अजूनही कायम असेल.

check weather your district is eligible for online liquor sale and know process of buying liquor online