

Mumbai One Stop Connectivity
ESakal
मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत परिवर्तन घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. चेंबूर स्टेशन हे मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरीय लोकल रेल नेटवर्कचे संगमस्थान म्हणून विकसित केले जात आहे. मेट्रो लाईन २बी वर असलेले हे स्टेशन प्रवाशांना 'वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी' प्रदान करेल. या इंटरचेंज सुविधेमुळे प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे पूर्व उपनगरातून दक्षिण-मध्य मुंबईकडे होणारा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा होईल.