छत्रपतींच्या महाराष्ट्रात ‘शेर शिवराज’ला चित्रपटगृहे मिळेनात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Maharashtra marathi movie Sher Shivraj Digpal Lanjekar did not get cinemas

छत्रपतींच्या महाराष्ट्रात ‘शेर शिवराज’ला चित्रपटगृहे मिळेनात!

मुंबई : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा ‘पावनखिंड'' या चित्रपटापाठोपाठ मागील आठवड्यात ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला; परंतु आता दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाला चित्रपटगृहेच कमी मिळत असल्याने निर्माते व दिग्दर्शक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कपटी आणि क्रूर अशा अफजलखानाचा वध केला. त्या प्रतापगडाची शौर्यगाथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना पुरेशा प्रमाणात चित्रपटगृहे मिळू नयेत, ही दुर्दैवाची बाब आहे.

‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी बलाढ्य अशा अफजलखानाचा वध करताना कोणती युद्धनीती अवलंबिली, तसेच मानसिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या त्याचे कसे खच्चीकरण केले आदी बारीकसारीक गोष्टींचा तपशील लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने या चित्रपटात मांडला आहे. मागील आठवड्यात हा चित्रपट तीनशेच्या वर स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद लाभला. आता मात्र चित्रपटगृहेच कमी मिळत आहेत.

आमच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असताना चित्रपटगृहे मिळत नाहीत आणि मिळाली तर सकाळी आठ किंवा रात्री दहा असे शोज देण्यात येतात. सकाळी आणि रात्री उशिराचे शो दिले तर संपूर्ण कुटुंब चित्रपट कसा पाहणार

- दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक

Web Title: Chhatrapati Maharashtra Marathi Movie Sher Shivraj Digpal Lanjekar Did Not Get Cinemas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top