

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
ESakal
मुंबई : मुंबई विमानतळाने आपलाच जुना विक्रम मोडीत काढला आहे. २१ नोव्हेंबरला २४ तासांच्या कालावधीत विमानतळावर एकूण १,०३६ विमानांचे आगमन आणि प्रस्थान झाले आहे. या दिवशी सीएसएमआयए येथून एकूण १,७०,४८८ प्रवाशांनी प्रवास केला. हा आकडा ११ जानेवारी २०२५ला नोंदवलेल्या १,७०,५१६ प्रवाशांच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे.