Badlapur: वेडात मराठे वीर दौडले सात म्हणत मराठा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन!

maratha festival badlapur
maratha festival badlapur sakal

मोहिनी जाधव

देशातच नव्हे तर अवघ्या जगभरात मराठी परंपरेचा नाद दुमदुमला आहे. स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अनुसरुन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही बदलापूर शहरात मराठा महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली असून, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या हस्ते मराठा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार व नमन करत, उद्या महाराष्ट्रात गाजलेल्या शाहीर रामानंद उगले यांचा शाहिरी शिवदर्शन पोवाडा व मराठी परंपरेच्या लोकगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.

maratha festival badlapur
Badlapur Panvel Highway: बदलापूर ते पनवेल अंतर थेट २० मिनिटांत, बोगद्याचे काम ५० टक्के पूर्ण

बदलापूर पूर्व तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सकल मराठा समाज हितवर्धक मंडळ बदलापूर यांच्यावतीने 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. चार दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात काल पहिल्या दिवशी सादर झालेला शिव पोवाडा ऐकून श्रोत्यांच्या अंगावर काटा आला.

शिवरायांच्या मराठा मावळ्यांचा पराक्रम पुन्हा जिवंत झाला. उद्घाटनाच्या दिवशी प्रमुख मान्यवर म्हणून कोळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी सकल मराठा हितवर्धक मंडळ बदलापूर चे प्रमुख आयोजक तथा कार्यकर्ते संजय जाधव, संभाजी शिंदे, अविनाश देशमुख, प्रियांका सावंत- दामले, राजेंद्र लाड अरुण सुरवड सुहास पोखरकर यांनी कार्यक्रमाची आखणी करत, मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. यावेळी आपण आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला महाराष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवणारे असे कार्यक्रम पाहण्यासाठी आणले पाहिजे कारण आता खरा इतिहास नामशेष होत चालला आहे व रचीत इतिहास व्हॉट्सॲप व इतर माध्यमातून दाखवला जात आहे. त्यामुळे वेळीच यासाठी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत प्रियांका सावंत दामले यांनी व्यक्त केले.

maratha festival badlapur
Badlapur News : ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी संचलन रॅली काढत केली जनजागृती!

तर, बदलापूर शहरात दीड लाख लोकसंख्या ही फक्त मराठा समाजाची आहे. व याच समाजाला एका छताखाली एकत्रित आणण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून करत असल्याचे मत संजय जाधव यांनी व्यक्त केले. तसेच मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावून ठेवलेल्या आमच्या योध्य्याला मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही शहरात हा उपक्रम आयोजित केला असून, या माध्यमातून आम्ही आमचा समाज एकसंध बांधण्याचे काम करत आहोत.

असे मत अरुण सुरवळ यांनी व्यक्त केले. तर, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बदलापूर शहरात मराठा भवन उभारण्यासाठी प्रयत्न करत असून, त्यासाठी निम्म्याहून जास्त निधी आम्ही जमा केलं असून, लवकरच आम्ही हे उपक्रमशील भवन उभारणार असल्याचे आयोजक संभाजी शिंदे यांनी सांगितले. यावेळी मराठी परंपरेला साजेसा व कोणताही आक्षेपार्ह कार्यक्रम न ठेवता पहिल्या दिवशी शिव पोवाडा तसेच शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा त्याचप्रमाणे रविवारी १८ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय भव्य अशी वारकरी परंपरेची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहे. व मुख्य म्हणजे सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, बाईक रॅली,तसेच महाराष्ट्राची लोकधारा गंध स्वराज्याच्या संस्कृतीचा हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

maratha festival badlapur
Badlapur Crime: मी डेंग डॅनियल बोलतोय! बदलापूरच्या तरुणाला पुण्यात बसून गंडवले, नायजेरियन भामटा असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

मराठा महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमाची आखणी, नियोजन सारं काही मराठी परंपरेला धरून आहे. स्वराज्याचा मराठी परंपरेचा इतिहास सांगणारा हा कार्यक्रम आहे. निश्चितच आपली परंपरा, आपले विचार, आपले धोरण ही त्रिसूत्रीच धर्माचे आणि परंपरेचे रक्षण करते. त्यामुळे परंपरेची नाळ जोडून ठेवलेल्या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. या कार्यक्रमाला बदलापूरकरांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे मी बदलापूरकरांना आवाहन करतो.

योगेश गोडसे, मुख्याधिकारी

maratha festival badlapur
Badlapur News : बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ; फलाट क्रमांक एक होणार बंद!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com