कर्जाच्या नावे फसवणुकीचे रॅकेट; आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

मुंबईतील पंतनगर पोलिसांनी तीन जणांना कथितरित्या कर्जाच्या नावे फसवणुकीचे रॅकेट चालवल्याबद्दल अटक केली आहे.

कर्जाच्या नावे फसवणुकीचे रॅकेट; आरोपी अटकेत

मुंबई - मुंबईतील पंतनगर पोलिसांनी तीन जणांना कथितरित्या कर्जाच्या नावे फसवणुकीचे रॅकेट चालवल्याबद्दल अटक केली आहे. आरोपी झोपडपट्ट्यांमधील 14 महिलांच्या केव्हायसी दस्तऐवजांचा वापर करून कर्जावर फोन खरेदी करण्यात येत होते. पंतनगर पोलिसांनी आरोपींवर आयपीसी कलम 420 , 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीना अटक केली आहे. या महिलांना मासिक कमिशनचे आश्‍वासन देण्यात आले, परंतु कर्ज वसुली करणारे एजंट त्यांच्या दारात आले तेव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी आतापर्यंत 30 मोबाईल उपकरणे ताब्यात घेतली आहेत.

महिलांची फसवणूक

मार्च 2022 मध्ये, एक महिला राजेंद्र साठे या सामाजिक कार्यकर्त्याच्या संपर्कात आली, ज्यांनी तिला "कमजोर क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी कागदपत्रे सामायिक करण्याच्या अटीवर दरमहा 500 ते 1,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले. मोहात पडून महिलेने तिची कागदपत्रे साठे यांच्याकडे दिली.एप्रिलमध्ये महिलेला साठे यांच्याकडून 500 रुपये मिळाले. ही महिला मोलकरीण म्हणून काम करते आणि तिचा नवरा बेरोजगार आहे. मे महिन्यात महीलेला कोणतेही कमिशन मिळाले नाही. महिला साठे यांच्या कार्यालयात गेल्यावर त्यांनी मला पुढील महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले, पण ते त्यांच्याकडून परत कधीही पैसे मिळाले नाहीत.

वसुली एजंटचा तगादा

कर्ज वसुली एजंट ऑगस्टमध्ये महिलेच्या घरी आला आणि तिने 35,000 रुपयांना विकत घेतलेल्या फोनसाठी पैसे देण्याची मागणी केली. हादरलेल्या महिलेने पंतनगर पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणाची माहिती दिली. पंतनगर पोलिसांकडे लवकरच आरोपी साठेविरुद्ध इतर तक्रारी येऊ लागल्या.

आरोपी बेपत्ता

दरम्यान, मुख्य आरोपी साठे यांच्या भावाने घाटकोपर पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवली कारण त्याचा भाऊ आरोपी साठे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून बेपत्ता होता. 20 ऑगस्ट रोजी साठे परतले आणि त्यांचा भाऊ आणि ते घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार रद्द करण्यासाठी गेले. महिलांना हा प्रकार समजताच त्यांनी स्वत: पोलीस घाटकोपर पोलीस ठाणे गाठले आणि पोलीसांना आरोपीविषयी माहिती दिली. त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी आरोपी साठेला पंतनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. कथित घोटाळ्यातून साठे यांनी किती पैसे कमावले आणि किती नागरिकांची फसवणूक केली याचा शोध पोलीस घेत आहे.

Web Title: Chieating Racket Loan Accused Arrested Crime Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..