Anand Paranjape : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थानिक पातळीवर शिवतारेंच्या विषयावर पडदा; आनंद परांजपे यांची स्पष्टोक्ती

शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल दिल्या आहेत.
vijay shivtare and anand paranjape
vijay shivtare and anand paranjapesakal

ठाणे - शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर केलेलं आरोप, तसेच सुनेत्राताई पवार यांना मतदान का करावे, त्यांचे कार्य काय असा सवाल उपस्थित करीत, बारामती मतदार संघातून थेट आवाहन देण्याचा प्रयत्न केला.

त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांना त्यांना आवर घालण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील शिवतारेंना समाज देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर स्थानिक पातळीवर या विषयावर पडदा टाकण्यात आला असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली.

शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की, रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टीका-टिपणी करत आहेत.

तर, नुकतेच विजय शिवतारे यांनी सुनेत्राताई पवार यांचे काय सामाजिक कार्य आहे की त्यांना बारामतीच्या लोकांनी मतदान केले पाहिजे? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर संतापलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन दिले. २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता का? डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते त्यांना मतदान करताना?

यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचाळवीर विजय शिवतारेंवर कोणती कारवाई करणार? हे स्पष्ट करावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतरेंना समाज देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तो विषय स्थानिक पातळीवर संपुष्टात आला असल्याची स्पष्टोक्ती परांजपे यांनी दिली.

डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा रात्रीस खेळ चाले - परांजपे

सिन्नरच्या सभेत आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेचा समाचार आनंद परांजपे यांनी घेतला. यावेळी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सकाळी ६ वाजल्यापासून विविध भागातून नागरिक समस्या घेवून येत असतात. त्यामुळे त्यावेळी जमणारा समुदाय बघा, पण ते आपणास कसे दिसेल. तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय नसून रात्रीस खेळ चाले अशी आपली प्रवृत्ती असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com