Devendra Fadnavis: 'राजकारणात नाही, मिमिक्रीत असते तर...'; देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना सुनावलं; राजकीय वातावरण तापलं

Devendra Fadnavis News: राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ते आमचे मित्र आहेत आणि राजकारणात त्यांच्यापासून आम्हाला कोणताही धोका नाही. पण ते राजकारणात आहेत याचा मला आनंद आहे.
Devendra Fadnavis On Raj Thackeray

Devendra Fadnavis On Raj Thackeray

ESakal

Updated on

आजकाल महाराष्ट्राच्या राजकारणात शब्दांचे बाण खूपच धारदार झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर असा टोला लगावला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे यांनी विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या हिंदी भाषणाची नक्कल करून त्यांना लक्ष्य केले होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत त्यांना एक उत्कृष्ट नक्कलकार म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com