Dahihandi Festival : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत येणार?

डोंबिवली पश्चिमेला शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.
CM eknath shinde
CM eknath shinde sakal

डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेला शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत हजेरी लावतात का याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतानाच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक इशारा देऊ केला आहे.

खासदार शिंदे म्हणाले मागच्या वर्षी मुख्यमंत्री बोटीने येथे आले होते. आता मानकोली पुलाने येतील. खासदार शिंदे यांचे हे विधान काही इशारा करते का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत किती वाजता आणि कोणत्या मार्गाने दाखल होतात हे आता पहावे लागेल.

डोंबिवली पश्चिमेतील दीपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या दहीहंडी उत्सवास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, भाऊ चौधरी, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याठिकाणी डोंबिवली मधील आशिर्वाद मित्र मंडळाने 8 थर लावत सलामी दिली आहे. त्यांचे कौतुक खासदार शिंदे यांनी केले. तसेच प्रो गोविंदा मध्ये सहभागी होत कल्याण डोंबिवलीकर कुठे ही कमी नाहीत हे दाखवून द्या. असे गोविंदाना सांगत खासदार शिंदे यांनी आशिर्वाद मंडळास प्रो गोविंदा मध्ये सहभागी होत जिंकून या असा सल्ला दिला.

खासदार शिंदे म्हणाले, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल आणि हे आपलं पहिलं सरकार असेल. गोविंदाचा दहा लाखाचा इन्शुरन्स काढण्याचं काम देखील आपल्या सरकारने केले आहे. गेल्या वर्षी जेव्हा हे सरकार आले त्यावेळी या खेळा वरील सर्व निर्बंध काढून टाकण्याचे काम केले गेले.

गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील या उत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. गेल्या वर्षी डोंबिवली पश्चिम येथील दीपेश म्हात्रे यांच्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री बारा वाजता हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोटीने या ठिकाणी आले होते.

यावेळी ते मानकोली पुलाने येथील असा इशारा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी किती वाजता दाखल होतात आणि कसे दाखल होतात हे पहावे लागेल.

ठाणे ते डोंबिवली हे अंतर 20 मिनिटात पार करणाऱ्या मानकोली पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे या पुलाची पाहणी करत येणार असल्याची चर्चा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com