CST Bridge Collapse: स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळला ही गंभीर बाब - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसएमटी जवळील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाजवळ पहाणी केली. यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे संध्याकाळपर्यंत निश्चित करा असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

सीएसएमटीसमोर असलेला पादचारी पूल काल (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, इतर 36 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

या घटनेनंतर सर्वच स्तरातून प्रशासनावर टिकेची झोड उठवली जात आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी हा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. त्याचा रेल्वे मंत्रालयाशी संबंध नाही. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून सर्वोतपरी मदत करण्यात येईल असे म्हटले आहे. त्यामुळे हा पूल नेमका कोणाच्या अखत्यारीत येतो यावरून मुंबई महापालिका व रेल्वे प्रशासनामध्ये जुंपली आहे. 

दरम्यान, या टोलवाटोलवीमुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सीएसएमटी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची हे संध्याकाळपर्यंत निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister said it is a serious matter that the bridge collapse even after a structural audit