esakal | खालापूर येथे खोदकामात सापडली शंकराची पिंड; नागरिकांमध्ये उत्सुकता...
sakal

बोलून बातमी शोधा

shivling

खालापूरमधील बहिराचा माळ परिसरात खासगी जागेचे सपाटीकरण करताना शनिवारी (ता. 20) प्राचीन शंकरांच्या मंदिराचे दगडी चिरे आणि पिंड सापडली आहे.

खालापूर येथे खोदकामात सापडली शंकराची पिंड; नागरिकांमध्ये उत्सुकता...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

खालापूर : खालापूरमधील बहिराचा माळ परिसरात खासगी जागेचे सपाटीकरण करताना शनिवारी (ता. 20) प्राचीन शंकरांच्या मंदिराचे दगडी चिरे आणि पिंड सापडली आहे. जागेच्या सपाटीकरणासाठी जवळपास 5 ते 6 फूट माती जेसीबीच्या सहाय्याने काढत असताना प्राचीन वास्तू आढळली. याबाबतची माहिती इंगळे यांनी तात्काळ खालापूरातील सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ यांना दिली. 

अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' दोन इमारती ठरतायेत कोरोनाचा हॉटस्पॉट...

पिंड सापडलेल्या ठिकाणापासून सोमेश्वर मंदिर जवळच आहे. सोमेश्वर मंदिर 1208 मधे बांधण्यात आल्याचा शिलालेख असून मुघल आक्रमणात नासधूस झालेल्या अनेक दगडी मूर्ती भग्नावस्थेत आहेत. त्यामुळे सापडलेल्या पिंड आणि दगडी चिऱ्यावरून या मंदिरालादेखील प्राचीन इतिहास असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दीपिका पदुकोन म्हणते सुशांतच्या परफार्मन्समध्ये दम होता...

तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी भेट देत पूजा केली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ, उपनगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेवक संतोष जंगम, मामा भोईर व ग्रामस्थ उपस्थित होते.पुरातत्व विभागाला याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी सांगितले. पिंड आणि मंदिराचे अवशेष सापडल्याचे समजताच खालापूरमधील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

मुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेते चीनशी पंगा घेणार; वाचा नेमकं काय करणार ते...

खालापूर गाव प्राचीन असल्याचा उल्लेख आहे. च लुटारू टोळी, मुघलांच्या सततच्या आक्रमणामुळे गाव खोलगट भागात वसवले गेले. त्यावेळी आक्रमणात मंदिर उध्वस्त झाले असण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाला माहिती दिली असून यामुळेच खालापूरच्या इतिहासावर प्रकाश पडेल.
- नवीनचंन्द्र घाटवळ, रहिवासी

 

loading image
go to top