'बालक दत्तक घेण्याची ऑनलाईन पध्दत चुकीची'

संजीत वायंगणकर
सोमवार, 2 एप्रिल 2018

'जननी आशिष 'संस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्योजक लक्ष्मीकात राठी अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षा डॉ. कीर्तिदा प्रधान, बिना धुत, जयश्री मोकाशी आदी उपस्थित होत्या.

डोंबिवली : यापूर्वी बालक दत्तक देताना पालकांची चौकशी, चर्चा व क्षमता पाहूनच दत्तकविधान होत असे. पण गेल्या चार वर्षांपासून ऑन लाईन पद्धतीने मूल दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे योग्य प्रकारे पालकांची माहिती होत नाही. दत्तक बालकांचे पूर्ण क्षमतेने संगोपन होत नाही. मुले व पालक यांच्यात दुरावा निर्माण होत असल्याने काही मुले पुन्हा संस्थेत येऊ लागली आहेत.दत्तक प्रणालीतील गैरप्रकार वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच यामध्ये बदल करण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

'जननी आशिष 'संस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्योजक लक्ष्मीकात राठी अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षा डॉ. कीर्तिदा प्रधान, बिना धुत, जयश्री मोकाशी आदी उपस्थित होत्या. खा. डॉ.श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले ,25 वर्षांपूर्वी 21 महिलांनी ही संस्था सुरू करण्याचे धाडस केले आपण समाजाचं देणं लागतो असे नुसते बोलतो पण काहीच करत नाही या महिलांनी बोलून दाखवलं नाही तर अनाथ मुलांचं संगोपन करण्याचे काम केले व आता पर्यंत 460 मुलांना पालक मिळवून दिले हे फार मोठे व वेगळे काम आहे .गेली 25 वर्ष ही संस्था हे काम करत आहे पण चार वर्षांपासून नवा कायदा आला व बालके ऑन लाईन पद्धतीमुळे देशाच्या कोणत्याही भागात दत्तक जाऊ लागली आहेत.

नव्या तंत्रज्ञानाचे जसे लाभ आहेत तसे तोटे पण आहेत पालक व मुले याची नीट ओळख होत नाही माहिती मिळत नाही व अशा घरात ते मूल जाते व काही दिवसांनी त्यांच्यात दुरावा निर्माण होऊन काही मुले पुन्हा संस्थेत येऊ लागली आहेत दत्तक मूल पुन्हा येऊ लागल्याने उद्देश साध्य होत नाही म्हणून यामध्ये बदल करावा व जूनी पद्धत आणावी यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणार असून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे त्यांनी पाच लाख रुपयांची  देणगी संस्थेला दिल्याची घोषणा केली. जनतेनेही सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन केले.खा. डॉ. शिंदे यांचे हस्ते समणिकेचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षा डॉ. कीर्तिदा प्रधान, जयश्री देशपांडे यांचीही भाषणे या प्रसंगी झाली.त्यात संस्थेची आजवरची वाटचाल व पुढील योजना यांची माहिती देण्यात आली. 

Web Title: child adoption method