विमान प्रवासात बालिकेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

मुंबई : सुरतहून शुक्रवारी मुंबईला आलेल्या स्पाईसजेटच्या विमानात रिया जिंदाल या चार महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनाही तिचा मृत्यू कधी झाला हे कळले नाही. शवविच्छेदन अहवालातही तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

रिया आपली आई प्रीती जिंदाल आणि आजी-आजोबांसह विमानातून सुरतहून मुंबईला येत होती. मुंबईत उतरल्यानंतर झोपलेली रिया प्रतिसाद देत नसल्याने तिची आई घाबरली. त्यानंतर लगेच कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. प्राथमिक उपचारानंतरही तिने प्रतिसाद दिला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child dies in plane journey

टॅग्स