नाट्य संमेलनाला बालनाट्यांनी आणली रंगत

संजीत वायंगणकर
गुरुवार, 14 जून 2018

डोंबिवली : 98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात गुरुवारी सकाळी दोन बालनाट्ये सादर करण्यात आली. नेपाळ सारख्या निसर्ग रम्य हिंदू राष्ट्रातील मुलींना कुमारीदेवी बनवून त्यांना हसण्या बागाडण्याच्या वयात दैवत्व प्राप्त झाले असा संस्कार करुन देवी बानविण्यात येते. या रुढी परंपरेवर प्रकाश टाकून सशक्त संहितेद्वारे भाष्य करत सर्व बालकरांच्या सक्षम अभिनयाने उपस्थित सर्व नाट्यरसिकांना विचार करण्यास भागा पाडणारे बालनाट्य ‘तेलेजू’ सादर केले.

अ.भा.नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूर यांनी. डॉ. मीरा शेंडगे यांची दमदार व नाजूक सामाजिक विषयाच्या संहितेला तितकेच वेगवेगळ्या प्रयोगशीलतेने दिग्दर्शन व संगीत होते मिहिका शेंडगे यांचे. 16 व्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक व अभिनयाचे रौप्यपदक मिळविणाऱ्या आर्या कुलकर्णी हिची अल्लड समिता या कुमारिकेची कुमारीदेवी होतानाची स्थित्यंतरे ताकदिने साकारणाऱ्या आर्याने प्रेक्षकांची प्रेक्षकांची मने जिंकली.

यानंतर मुंबई कल्चरल सेंटरने सादर केले भन्नाट व जंगलबुक या लहानग्यांच्या आवडीच्या कार्टून वर आधारीत परंतू जाती धर्माच्या विळख्यात न अडकता माणूस म्हणून जगावे व सर्वांवर माणूस म्हणून प्रेम करुन वेळप्रसंगी धावून जाण्याची शिकवण देणारे ‘जंबा बंबा बू’ हे सक्षम कुलकर्णी याच्या सक्षम अशा मोगली या मध्यवर्ती भुमिकेने साकार झालेल्या व समयोचीत व सद्य परिस्थिती वर भाष्य करणाऱ्या पंचेस व अॅडिशन्स नी हे बालनाट्य रसिकांना खूपच भावले.

Web Title: children plays are attracting in akhil bhartiya natya sammelan