लहान मुलं करताय कोरोनाशी दोन हात; मुंबईत केवळ 'इतक्याच' मुलांना कोरोना...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

आतापर्यंत कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 50 पेक्षाजास्त वयोगटातील लोकांना अधिक संसर्ग झाला आहे. त्यातुलनेत लहान मुलांमधील कोरोनाचे प्रमाण फार कमी आहे.

मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना एक समाधानकारक माहिती समोर येत आहे. मुंबईत मार्चपासून आतापर्यंत य़य़ इतक्या रुग्णांची नोंद झाली. मात्र कोरोना महामारीमुळे मुंबईत आतापर्यंत केवळ 1300 लहान मुलं संक्रमित झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांमध्ये कोरोनाचे असलेले कमी प्रमाण ही चांगली बाब आहे. ज्येष्ठ नागरिकांपेक्षा लहान मुलांमध्ये कोरोनासोबत दोन हात करण्याची ताकद अधिक आहे. मात्र, असे असले तरी 85 टक्के लहान मुलं लक्षणरहित आढळली असून ज्यांची ओळख होणं कठीण झालं आहे. 

मुंबईतील नागरी समस्येवर व्यक्त होणारी पत्रचळवळ अखेर थांबली...

आतापर्यंत कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 50 पेक्षाजास्त वयोगटातील लोकांना अधिक संसर्ग झाला आहे. त्यातुलनेत लहान मुलांमधील कोरोनाचे प्रमाण फार कमी आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, नवजात बालकांपासून 10 वर्ष वयोगटापर्यंतच्या आतापर्यंत एकूण 1,311 लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील केवळ 7 मुलांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू ही झाला आहे. 

पिवळ्या बेडकांची वसईत डराव डराव; लॉकडाऊनमध्येही भरली अनोखी शाळा...

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, मुंबईत एकूण कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी अभ्यासली असता, एक टक्क्यांहून कमी लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या नसतात. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यांच्यामध्ये डायबिटीज, हायपरटेंशन आणि अन्य काही आजार नसतात. त्यांची फुप्फुसेही चांगल्या परिस्थितीत असतात. राज्यात 6 हजार लहान मुलं कोरोनाने संक्रमित झाले आहेत. मात्र, त्यांचा बरे होण्याचे प्रमाण ही चांगले आहे. 

बापरे! विक्रोळीत कन्नमवारनगर बेस्ट चौकीत शिरले पाणी; वाहक - चालकांचे होतायत हाल.. 

पालिकेच्या कॉन्प्रिहेंशन थॅलेसेमिया केअर पीडियाट्रिक डर्मेटोलॉजी ऑंकोलॉजी अॅण्ड बीएमटी सेंटर'च्या संचालक डॉ. ममता मंगलानी यांनी सांगितले की, सर्वाधिक मुलं लक्षणरहित असतात. काही अभ्यासानुसार, लहानपणी दिली जाणारी बीसीजी, एमएमआर, पोलिओ लसीमुळे त्यांना दुप्पट रोगप्रतिकारक शक्ती मिळते. सर्वसामान्य मुलं तर या रोगापासून बरे होत आहेत. मात्र, कर्करोगासारख्या भयानक आजाराशी लढा देत असणाऱ्या मुलांना कोरोनाचा त्रास होत आहे. आमच्या येथे 3 ते 4 कर्करोगग्रस्त मुलांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतलले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: childrens are less suffered from corona as compare to senior citizen