चिंचोटी धबधबा परिसरात पर्यटक अडकले

पीटीआय
सोमवार, 9 जुलै 2018

मुंबई - पालघर जिल्ह्यातील वसई येथे शनिवारी धबधब्याजवळ सहलीला गेलेल्या शंभरहून अधिक जण मुसळधार पावसामुळे अडकून पडले होते. मात्र स्थानिक नागरिक आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले. दरम्यान, मुंबईतील एका पर्यटकाचा मृत्यू झाला.

तुंगारेश्‍वर येथे प्रसिद्ध चिंचोटी धबधबा असून दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते. चिंचोटी धबधबा परिसरात सुमारे 120 हून अधिक नागरिक पर्यटनासाठी गेले होते. मात्र काल सकाळपासून परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे सर्वच नागरिक अडकून पडले. या प्रकाराची माहिती कळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शंभर जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले. दृष्यमानता कमी झाल्याने हेलिकॉप्टर अधिक वेळ तेथे काम करू शकले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या दुर्घटनेत कांदिवलीच्या एका व्यक्तीचा पाय घसरून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Chinchoti Waterfall Tourist