esakal | मोठी बातमी! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; बाप्पाची मूर्ती घडणार मंडपातच...
sakal

बोलून बातमी शोधा

ganesha statue making

गिरणगावातील 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडपात गणेश मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; बाप्पाची मूर्ती घडणार मंडपातच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गिरणगावातील 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडपात गणेश मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकभावनेचा विचार करून तसेच सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता व पोलिसांवर असलेली जबाबदारी त्यांच्यावर गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करून चिंतामणीच्या मंडपातच मुर्ती घडविण्यात येणार आहे.

मुर्तीच्या उंचीबाबत राज्य सरकार जे निर्देश देईल त्यानुसार मुर्ती बनविण्यात येईल.मुर्ती जागेवर घडविण्याची चिंतामणीच्या मु्र्तीकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा: आता इन्फ्रारेड कॅमेरा तुमच्या शरिराच्या तापमानावर लक्ष ठेवणार; पण कुठे? वाचा बातमी सविस्तर

चिंचपोकळी च्या चिंतामणी चा पाटपूजन सोहळा रद्द करून  ठरावीक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत ठराविक अंतर ठेवून साधेपणाने पाटपूजन होईल.‌यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाई वर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून शासकीय रुग्णालयांना वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

‌प्रशासनाकडून देण्यात येणा-या सर्व सुचनांचे पालन करूनच यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात येईल.कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता पोलिस प्रशासना वर कसल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण पडणार नाही.याची मंडळाकडून दक्षता घेण्यात येईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली.

हेही वाचा: Live Update : सुशांतसिहवर विलेपार्ले स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

भाविकांना ऑनलाईन दर्शन:

 कोरोना च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात विभागीय वर्गणीदार यांच्या व्यतिरिक्त इतर भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. उत्सव कालावधीत विभागीय वर्गणीदार यांना नियोजनानुसार ठराविक वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परंतू चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन सर्व चिंतामणी भक्तांसाठी ऑनलाईन उपलब्ध असेल. त्यामुळे उत्सव काळात ईतर चिंतामणी भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केले आहे.

chinchpoklicha chintamani mandal takes big decision read full story  

loading image