‘या’ देशातील महापौरांनी केलं नवी मुंबईचं कौतूक!

‘या’ देशातील महापौरांनी केलं नवी मुंबईचं कौतूक!
‘या’ देशातील महापौरांनी केलं नवी मुंबईचं कौतूक!

नवी मुंबई : शहराच्या हद्दीत प्रवेश केल्यापासूनच शहरातील विकासाचे वेगळेपण नजरेला जाणवते, अशा शब्दांत नवी मुंबईच्या प्रगतीचे चीनमधील युवू शहराचे महापौर व्हॅंग जियान यांनी कौतुक केले. नवी मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे शहराचे भविष्य आणखी उज्ज्वल होईल, अशा शुभेच्छा जियान यांनी दिल्या. महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी चिनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. 

अण्णासाहेब मिसाळ यांनी सादरीकरणाद्वारे नवी मुंबई महापालिका क्षेत्राची तसेच महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उल्लेखनीय कामांची व प्रकल्पांची माहिती सादर केली. व्हॅंग जियान यांनीही चिनमधील युवू शहर हे जगातील सर्वात मोठे वाणिज्य शहर असल्याची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. युवू व नवी मुंबई या दोन शहरांमध्ये बरेचसे साम्य असल्याचे सांगत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत, अशी अपेक्षाही व्हॅंग यांनी व्यक्त केली.

नवी मुंबईचे विविध सुविधांमधील वेगळेपण अधोरेखित करीत नवी मुंबईचा प्रथम नागरिक या नात्याने युवूसारख्या नामांकित शहराच्या महापौरांचे नवी मुंबईत स्वागत करताना आनंद होत असल्याची भावना महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केली. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीची व तेथील व्यवस्थेची प्रशंसा केली. तसेच युवू शहराच्या महापौरांनी त्यांच्या शहरात येण्याचे निमंत्रण नवी मुंबईचे महापौर, आयुक्त यांच्यासह पदाधिकाऱ्यांना दिले. या वेळी युवूच्या महापौरांसह उपस्थित संचालक यांग झोनघॉन्ग व लाऊ झिओडॉन्ग आणि इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांचेही नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com