महिनाभरात फक्त वसईमध्ये १००+ बलात्कार तर २००+ विनयभंगाच्या घटना; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

संदीप पंडित
Monday, 5 October 2020

महिला अत्याचारात राज्यात वाढ होत आहे हे  राज्याचे वास्तव आहे आणि हे महाराष्ट्र सहन करतोयं मुख्यमंत्री महोदयं...अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

विरार  - उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरत येथे सामुदायिक अत्याचार झालेल्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुकी केली होती. त्यावेळी प्रियंका गांधी यांच्या कपड्यांना  हात लावायचा प्रयत्न कसा केला असा सवाल करत याबाबत संबधित पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कडे केली आहे.

चित्रा वाघ नालासोपारा येथे आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबाला भेटायला आल्या होत्या. त्यांनी यावेळी राज्य शासनावर टीका केली. तर भरात वसई विरार झोन मध्ये  100 पेक्षा जास्त बलात्कार तर 200 पेक्षा जास्त विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे, नवीन पोलीस आयुक्तांपुढे या घटना थांबवण्याचे आव्हान असणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

चित्रा वाघ ह्या महिलांवर अत्याचाराविरोधात आवाज उठवला. दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की तसेच त्यांच्या कपडयांना हात घातल्याचे समोर आले. याबाबत बोलताना वाघ यांनी संताप व्यक्त केला आणि सांगितले की, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान केला जातो त्यामुळे असा प्रकार खपवून घेता काम नये. प्रियंका गांधी ह्या राजकीय नेत्या आहेत,. राजकारणापलीकडे जाऊन कोणत्याही महिलेचा आत्मसन्मान जपायलाच हवा. यासाठी आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे त्या पोलीस विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे आणि त्यावर कारवाई ही नक्कीच होईल असा विश्वास आहे. 

कंगनाच्या ऑफिस पाडकामाची सुनावणी पूर्ण; न्यायालयाने निर्णय ठेवला राखून 

एका बाजूला चित्र वाघ ह्या उत्तर प्रदेश पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्रात पोलिसांकडून महिलांवर सुरु असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचून राज्य सरकारलाही खडे बोल सुनावले. याप्रकरणातील संबधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.  नव्याने आयुक्त झालेल्या सदानंद दाते यांच्या पुढे  महिनाभरात फक्त वसई झोन मध्ये 100 पेक्षा जास्त बलात्कार तर 200 पेक्षाजास्त विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. महिला अत्याचारात राज्यात वाढ होत आहे हे  राज्याचे वास्तव आहे आणि हे महाराष्ट्र सहन करतोयं मुख्यमंत्री महोदयं...असा म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitra Wagh criticizes the Chief Minister on the issue of atrocities against women in Maharashtra