...म्हणून मी भाजपात प्रवेश केला; चित्रा वाघांचा राष्ट्रवादीवर आरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

माझ्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. भाजप सत्ताधारी पक्ष आहे म्हणूनच मी भाजपमध्ये आले आहे. लोकांची भूमिका मांडण्याऐवजी आता त्या सोडवून दाखवेन. मी कुठेही पळून गेलेले नाही. मी गद्दार नाही, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला, असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिले.

मुंबईः माझ्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. भाजप सत्ताधारी पक्ष आहे म्हणूनच मी भाजपमध्ये आले आहे. लोकांची भूमिका मांडण्याऐवजी आता त्या सोडवून दाखवेन. मी कुठेही पळून गेलेले नाही. मी गद्दार नाही, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला, असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिले. त्यांनी आज (ता.31) भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. 

पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला, त्या त्या ठिकाणी मी आवाज उठवला, मी सरकारविरोधात अनेक आंदोलनं आणि मोर्चे काढले. पतीच्या चौकशीचा आणि भाजपा प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे. 

चित्रा वाघ यांनी पतीला वाचवण्यासाठी भाजपामध्ये जात असल्याचं पवारांना सांगितलं होतं. ईडी, सीबीआय यांचा वापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात आहे. सरकार राज्य बँकेद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपामध्ये येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पवारांनी केला होता. चित्रा वाघ यांचे पती चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत. चित्रा वाघ मला भेटल्या असून, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असं पवार म्हणाले होते. आम्ही त्यांना काहीही मदत करू शकत नसल्याचंही पवारांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitra Waghs comment on entering bjp