जव्हार अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी चित्रांगण घोलप बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मोखाडा (पालघर) : पालघर जिल्ह्यात बॅकींग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या जव्हार अर्बन को. ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी अनुभवी संचालक चित्रांगण घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष चंद्रकांत पटेल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवडणूक घेण्यात आली आहे. 

जव्हार अर्बन बँकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. बँकेचे सर्वच्या सर्व 17 संचालक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे चित्रांगण घोलप यांना सर्व संचालकांनी संमती दिल्याने, त्यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. घोलप हे शिवसेना जव्हार शहरप्रमुख असून, त्यांनी जव्हार नगरपरिषदेत पाच वर्ष नगरसेवक पद भूषविले आहे. उत्तम व अभ्यासू वक्ते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. 

Web Title: chitrangan gholap elected as president of javhar urban bank