Christmas 2022 : नाताळच्या निमित्ताने मुंबईतील मॉल्स , हॉटेल्स सजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Christmas 2022 Malls and hotels in Mumbai decorated occasion of Christmas mumbai

Christmas 2022 : नाताळच्या निमित्ताने मुंबईतील मॉल्स , हॉटेल्स सजले

मुंबई : दोन वर्षाच्या काळानंतर नाताळ सणाची लगबग आपल्याला पाहायला मिळत आहे. ख्रिसमसच्या सणानिमित्त मुंबई शहर लाल, पांढरे, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगांनी सजलेले पाहिला मिळत आहे. सध्या मुंबई शहराचा प्रत्येक कोपरा ख्रिसमसच्या सजावटीने सजला आहे .

वांद्रे येथील पारंपारिक ठिकाणांपासून ते दादर आणि ठाणेपर्यंत,मुंबई ख्रिसमसच्या रंगात आणि रोषणाईच्या उजेडात न्हाऊन निघत आहे. मुंबईच्या बाजारपेठा नाताळच्या गिफ्ट्सनी भरला आहे. सामान्य मुंबईकर दुकानातील डिस्प्लेवर लागलेल्या ख्रिसमस गिफ्टच्या सौंदर्यात रममाण होत आहे.

ख्रिसमस स्पेशल वांद्रे

मुंबईचा वांद्रे संपूर्ण परिसर नाताळच्या रोषणाईने आणि रंगांनी नटलेला आहे . नेत्रदीपक दृश्यानी परिसर उजळला आहे. या गल्ल्यांमधून फक्त एक फेरफटका मारल्यास तुम्हाला ख्रिसमसच्या सणामध्ये गुंफल्यासारखे वाटेल. जुन्या शैलीतील घरे आणि व्हिला सर्वात सुंदर आणि आकर्षक दिसतात. ख्रिसमस काळात या परिसरातील गल्ल्या रोषणाई, तारे , कंदीलानी फुललेली आहे.

रंगीबेरंगी रोषणाई करणारे दिवे झाडांना सजवतात आणि संपूर्ण सुट्टीचा उत्साह देतात. दरवर्षी आयोजित केला जाणारा 'विंटर लाइट फिएस्टा' कोरोना प्रादुर्भावामुळे 3 वर्षांनी साजरा करण्यात येत आहे. आजूबाजूचे अनेक परिसर सजलेले असून थाटामाटात ख्रिसमस साजरा करण्याची तयारी करत आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने सेंट अँड्र्यू चर्च, हिल रोड सारखे परिसर पाहण्याजोगे आहेत.

मॉल्स ग्राहकांसाठी सज्ज

मुंबईत या वर्षी मॉल्स आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सजले आहे. जवळजवळ 3 वर्षांनी मॉल्स नाताळ निम्मीत खुले असणार आहे. कोरोना काळात प्रतीबंधामुळे गेली 2 वर्ष मोठा फटका बसला होता. 24 डिसेंबरपासून सुरू होऊन 1 जानेवारीपर्यंत, मॉलमध्ये आकर्षक सजावट, ख्रिसमस मार्केट आणि वेगवेगळ्या ऑफर ग्राहकांना देत आहेत .तसेच लहान मुलांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना गिफ्ट देण्यासाठी काही मॉल्स मध्ये संटाक्लौज ठेवण्यात आला आहे. लहानग्यांना आनंद घेण्यासाठी मजेदार गेम्स सुद्धा काही मॉल्स मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

हॉटेल्स सजले

ख्रिसमस काळात आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेस्टो बार आणि पब विविध ऑफर देत आहेत. या ऑफरमध्ये खाद्यपदार्थ आणि शीतपेयांचे विविध कॉम्बोज, ग्राहकांसाठी ख्रिसमस पार्टी असे विविध उपक्रम हॉटेल्स करत आहे

काही हॉटेल्सनी अनेक ऑफर ठेवल्या आहेत. तर काही हॉटेल्सनी खास मेनू तयार केला आहे .सर्व वयोगटातील व्यक्तीना उत्साहाचा आणि उत्तम वातावरणाचा आनंद घेता येणार आहेत. पिझ्झाचे स्पेशल कॉम्बोज, फिंगर फूड्स , ख्रिसमस पार्टी ऑफर रेस्टो, पबतर्फे दिल्या जात आहे.