राज्यपालांकडून नाताळच्या शुभेच्छा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या कल्याणकारी जीवनाचे विशेषतः त्यांच्या करुणा व क्षमाशीलतेच्या संदेशाचे स्मरण देतो. येशू ख्रिस्तांनी शाश्वत सत्य व नीतिमूल्यांचा पुरस्कार करताना सहन केलेल्या यातनांचेदेखील या वेळी स्मरण होते. नाताळचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व संपन्नता घेऊन येवो. मी राज्यातील सर्व लोकांना नाताळनिमित्त मेरी ख्रिसमस व नववर्षाच्या शुभेच्छा देतो, असे विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Web Title: Christmas Good luck by Governor