मुंबई : महिलेसह तिच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नातेवाईकांना अटक

culprit arrested
culprit arrestedsakal media

मुंबई : गेल्या आठवड्यात एका महिलेला आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलाला आत्महत्या (Mother-son suicide) करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोन नातेवाईकांना चुनाभट्टी पोलिसांनी (chunnabhatti police) शनिवारी अटक केलीय. श्रृती महाडीक (३६) असं मृत महिलेचं नाव आहे. मृत महाडीक यांचा दूरचा नातेवाईक असणाऱ्या सचिन महाडीक आणि त्याचे वडील किशोर याला पोलिसांनी बेड्या (Two culprit arrested) ठोकल्या. कौटुंबिक समस्यांमुळे या दोन नातेवाईकांनी छळ केला असल्याचं मृत महाडीक यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये लिहिलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (chunnabhatti police arrested two culprit for abetment in mother-son suicide case)

culprit arrested
एसटीचा संप बेकायदेशीर; मुंबई कामगार न्यायालयाने दिले आदेश

याबाबत सविस्तर वृत्त असं की, श्रृती आणि तिचा मुलगा राजवीर नेहरु नगरमधील अल्टा विस्टा टॉवरमध्ये राहत होते. याच घराच्या पाठीमागे असलेल्या खाडीमध्ये शुक्रवारी नेहरु नगर पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला नेहरु नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

त्यानंतर हे प्रकरण चुनाभट्टी पोलिसांकडे देण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत श्रृतीला आणि राजवीरला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन नातेवाईकांना ताब्यात घेतलं. "कौटुंबिक कारणांमुळे ही घटना घडलीय. याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे." अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com