

सिबील स्कोअरच्या आधारावर आलिशान कारची चोरी करणाऱ्या हायटेक टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने केलाय. पोलिसांनी टोळीकडून जवळपास साडे सात कोटींच्या १६ आलिशान कार जप्त केल्यात. तर सात जणांना अटक केली आहे. टोळीने जीएसटी नंबर मिळवून लोकांचा सिबिल स्कोअर तपासला. त्यात चांगला सिबिल स्कोअर असणाऱ्या लोकांच्या नावावर गाड्या विकत घेतल्या. नंतर त्या गाड्या काळ्या बाजारात विकल्या जात होत्या.