अनधिकृत बांधकामांवर कारवाई.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई.

अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

पनवेल : तरघर रेल्वेस्थानक, फॉरकोट एरिया, उलवे नोड, तसेच मोहल्ला परिसरात सिडको अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. जानेवारीमध्येही या भागात सिडकोकडून कारवाई करण्यात आली होती; मात्र पुन्हा या भागात बांधकामे उभी राहिल्याने मंगळवारी (ता. २०) सिडकोकडून कारवाई करण्यात आली.

मंगळवारच्या कारवाईत या भागात बांधलेल्या पाच चाळी, तसेच पत्र्याने तयार केलेल्या शेडच्या खोल्या तोडण्यात आल्या. कारवाईपूर्वी सोमवारी सुरू असलेल्या ११ बांधकामांना नोटीस बजावण्यात आली होती. तर, राहत्या घरांना सहा महिन्यांपूर्वी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सिडको विभागाकडून देण्यात आली आहे. 

सिडकोच्या या कारवाईला विरोध करत पावसाळ्यात कारवाई न करणे हा सरकारचा नियम असल्याने प्रकल्पग्रस्तांची बांधकामे तोडू नयेत, यासाठी अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्यासोबत नवीन स्थापन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या समितीकडून बोलणे करून १० दिवसांची मुदत घेतल्याची माहिती स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष गौरव म्हात्रे यांनी व्यक्त केले. कारवाईला विरोध होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन, एनआरआय पोलिस ठाण्याने येथे बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com