
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतरही अद्याप सिडकोची नवी मुंबईतील जलवाहतूक रखडली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच वर्षा निवासस्थानी या सुविधेचे लोकार्पण झाले होते. त्याला सहा महिने उलटले तरी अद्यापही सेवा सुरू न झाल्याने सिडकोचे ११० कोटी वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई व नवी मुंबईदरम्यानच्या सागरी किनारपट्टीवर जलवाहतूक विकसित करून वाहतूक व्यवस्थेमध्ये आणखी नवीन पर्याय तयार करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.