

Navi Mumbai CIDCO House Lottery
ESakal
नवी मुंबई : सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ४,५०८ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस शनिवारी (ता. २२) दुपारी चार वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. अर्जदारांना प्रथमच स्वत:च्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.