सिडकोची शिल्लक ९९१ घरे सर्वसाधारण ग्राहकांसाठी

सिडकोची शिल्लक ९९१ घरे सर्वसाधारण ग्राहकांसाठी
सिडकोची शिल्लक ९९१ घरे सर्वसाधारण ग्राहकांसाठी

नवी मुंबई : सिडकोतर्फे नुकत्याच काढण्यात आलेल्या ९ हजार २४९ घरांच्या योजनेतील शिल्लक राहिलेली ९९१ घरे सर्वसाधारण गटातील प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना देण्यात येणार आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २६ नोव्हेंबरला नेरूळच्या आगरी-कोळी भवनात सिडकोने संगणकीय पद्धतीने लॉटरी काढली होती. 

प्रधानमंत्री आवास योजनेतील "सर्वांसाठी घरे'या उद्दिष्टांतर्गत सदर योजनेतील घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या गृहनिर्माण योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३१७६ सदनिका व अल्प उत्पन्न घटकासाठी ६०७३ सदनिका नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यांपैकी तळोजा येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील वेगवेगळ्या प्रवर्गातील एकूण ९९१ सदनिका शिल्लक राहिल्या होत्या. 

सिडको संचालक मंडळातर्फे पारित करण्यात आलेल्या ठरावानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती या प्रवर्गाचे आरक्षण वगळता इतर प्रवर्गातील घरे शिल्लक राहिल्यास सदर घरे सर्वसाधारण प्रवर्गांतर्गत वाटप करण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ही शिल्लक ९९१ घरे याच गृहनिर्माण योजनेतील प्रतीक्षा यादीवरील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीतील संबंधित अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com