
वाशी : सर्वसामान्यांकरिता घरे निर्माण करणारी सिडको आता श्रीमंतांच्या किमतीमध्ये गरिबांकरिता घरे विक्री करणार आहे. ‘माझे पसंतीचे घर’ या शीर्षकाखाली सिडकोने विक्रीस काढलेल्या २६ हजार घरांच्या किमती सिडकोने बुधवारी (ता. ८) जाहीर केल्या.
खारघर रेल्वे स्थानकाजवळच्या घरांसाठी सिडकोने तब्बल ९७ लाख २० हजार आणि वाशी येथे लहान आकाराच्या घरांसाठी ७४ लाखांपर्यंत किंमत आकारली आहे. सिडकोच्या किमती खासगी बिल्डरांपेक्षा अधिक असल्याने सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गोरगरिबांची स्वप्नातील घर खरेदी करण्याची आशा मावळली आहे.