

CIDCO House Rate Reduction
ESakal
नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिडकोच्या विविध गृहनिर्माण श्रेणींच्या किमती एका फ्लॅटमध्ये १० टक्क्यांनी कमी होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. या निर्णयामुळे आता सामान्य माणसाला ही घरे पूर्वीपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होतील. ज्यामुळे नवी मुंबई परिसरात घर खरेदी करणे सोपे होईल.