

CIDCO Mega Housing Scheme
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांच्या किमतीत थेट १० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यामुळे सिडकोची घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व कळंबोली या महत्त्वपूर्ण नोड्समध्ये सिडकोची १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना रविवारी (ता. १४) जाहीर होणार आहे.