

CIDCO
Esakal
नवी मुंबई : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) ही संस्था सध्या एका अभूतपूर्व प्रशासकीय आणि कर्मचारी व्यवस्थापन संकटातून जात आहे. गेल्या काही दशकांत सिडकोने अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना आकार दिला असला, तरी संस्थेच्या अंतर्गत कामकाजात आता मोठ्या त्रुटी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः कर्मचारी संघटनेने उपस्थित केलेले प्रश्न, बदल्यांच्या धोरणातील शिथिलता, राजकीय हस्तक्षेप आणि रिक्त पदांमुळे कोलमडलेली वसाहत व्यवस्थापन यंत्रणा या बाबी अत्यंत गंभीर आहेत.