Mumbai News: प्रवाशांचे हाल संपणार! हार्बर मार्गावरील तीन स्थानके मध्य रेल्वेची होणार, कोणती आणि का?

Central Railway: हार्बर मार्गावरील तीन स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. यामुळे अनेक वर्षे प्रवाशांचे सुरू असलेले हाल संपणार आहेत.
 Central Railway Take Over CIDCO Station

Central Railway Take Over CIDCO Station

ESakal

Updated on

नवी मुंबई : हार्बर मार्गावरील सिडकोने निर्माण केलेल्या रेल्वे स्थानकांपैकी तीन रेल्वे स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत आज तीन रेल्वे स्थानकांची हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. म्हस्के यांच्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मध्य रेल्वे आणि सिडको यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे अनेक वर्षे प्रवाशांचे सुविधांअभावी सुरू असलेले हाल संपणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com