नव्या वर्षात सिडकोची साफसफाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

नवी मुंबई - अतिक्रमणविरोधी कारवाई थंडावल्यानंतर शहरातील मोक्‍याच्या जागा बळकावणाऱ्या भूमाफियांविरोधात सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक या महिन्यात धडक कारवाई करणार आहे. त्याचे नियोजन झाले असून तळोजापासून पनवेल-उरण आणि रबाळेपर्यंतच्या परिसरात ही कारवाई करण्यात येणार आहे. 

दिघ्यापासून अगदी पनवेल-उरणपर्यंत सिडकोची हद्द आहे. त्यामधील मोक्‍याचे भूखंड हडपण्याचा डाव भूमाफियांचा असतो. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच हा डाव उधळण्याचा मनसुबा सिडकोने आखला आहे. त्यानुसार ४ ते ३१ जानेवारीदरम्यान मोहीम हाती घेण्यात येणार आहे. 

सिडकोच्या पथकाने कोपरखैरणे, घणसोली, एरोली सेक्‍टर २० येथील महावितरणच्या राखीव भूखंडांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तळोजा परिसरातील पेंधर गावाच्या शेजारच्या मोकळ्या भूखंडावर काही विकासकांनी बांधलेल्या इमारतीही हटवण्यात येणार आहेत. नवीन पनवेल व वरचे ओवळे भागातील भंगारवाले व गॅरेजवाल्यांवर कारवाई होणार आहे. उरण तालुक्यातील अनेक भूंखड गोदाम माफियांनी बस्तान बसवले आहे. ते हटवण्यात येणार आहेत.  यासाठी सिडकोने नवी मुंबई पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.

नवी मुंबई पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी 
पोलिसांकडून बंदोबस्त मंजूर झाल्यास वर्षाच्या सुरुवातीलाच कारवाईचा धडाका सुरू होणार असून अनेक भूखंड मोकळे करण्याची कामगिरी यशस्वी होईल, अशा विश्‍वास सिडकोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: CIDCO will take action in this month encroachment