सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत घरांना गळती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सिडकोच्या खारघरमधील स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील इमारतींना गळती लागली आहे. निम्म्यापेक्षा जास्त इमारतींमधील घरांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः ठिबक सिंचनाप्रमाणे पाणी ठिपकत आहे. सिडकोने या सोसायटीची उभारणी करून अडीच वर्षेही उलटलेली नाहीत, तोच बहुतांश घरांना गळती लागल्यामुळे इमारतींच्या बांधकामांच्या दर्जाबाबत रहिवाशांकडून प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

नवी मुंबई : सिडकोने खारघरमध्ये अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी तयार केलेल्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील इमारतींना गळती लागली आहे. निम्म्यापेक्षा जास्त इमारतींमधील घरांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः ठिबक सिंचनाप्रमाणे पाणी ठिपकत आहे. सिडकोने या सोसायटीची उभारणी करून अडीच वर्षेही उलटलेली नाहीत, तोच बहुतांश घरांना गळती लागल्यामुळे इमारतींच्या बांधकामांच्या दर्जाबाबत रहिवाशांकडून प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

२०१४ च्या सुमारास सिडकोने खारघर सेक्‍टर- ३६ येथे स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील सुमारे ३ हजार ३३४ घरांची विक्री सोडत पद्धतीने केली होती. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना ३७० चौरस फुटांचे घर; तर अत्यल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना ३१० चौरस फुटांची घरे सिडकोने दिली. सध्या स्वप्नपूर्ती सोसायटीत ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रहिवासी राहण्यासाठी आलेले आहेत. मात्र पावसामुळे अनेक इमारतींमधील बाहेरच्या मोकळ्या जागांवरील छतांमधून पाणी गळत असल्याचे समोर आले आहे. तर अनेक इमारतींमधील उद्‌वाहक यंत्राच्या वरील छतामधूनही पाणीगळती आहे.

अधिकाऱ्यांचे खुर्चीतूनच फर्मान
सिडकोच्या सेक्‍टर- ३६ येथील कार्यालयात स्वप्नपूर्ती संकुलातील रहिवाशांनी अनेकदा गळक्‍या घरांबद्दल तक्रारी केल्या; मात्र तक्रारीनंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना खुर्चीतूनच फर्मान सोडले जात आहे. त्यानंतर या तक्रारींचे काय झाले हेदेखील पाहण्याची साधी तसदी अधिकाऱ्यांकडून घेतली जात नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In CIDCO's swapnapurti society the houses Leakage