esakal | मतांवर डोळा ठेवून नागरिकांची 'काळजी'
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मतांवर डोळा ठेवून नागरिकांची 'काळजी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिवा : कोकणात गणपतीला गावी जाण्यासाठी कोरोना (Corona) अहवाल राज्य सरकारने बंधनकारक केला आहे. त्यामुळे कोकणात (Kokan) जाणाऱ्या नोकरदार मुंबईकरांना (Mumbai) खासगी प्रयोगशाळेत धाव घ्यावी लागली आहे. ही आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीसाठी खासगी प्रयोगाशाळेत ८०० रुपये दर आकारला जात आहे. मात्र, या खर्चाचा भार नागरिकांच्या खिशावर पडू न देता राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शिवसेना (Shivsena), मनसे (MNS) आणि भाजप (BJP) खासगी प्रयोगशाळेत ८०० रुपयांच्या चाचणीतील ६०० रुपयांचा वाटा उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

आगामी पालिका निवडणुकांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांनी दिव्यातील नोकरदारांसाठी अवघ्या २०० रुपयांत चाचणी करून देण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय पक्षांचा दुसरा कोणताही हेतू नाही, अशा शब्दांत व्हाट्सअप समूहावर खिल्ली उडविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिव्यात नोकरदारांची संख्या २० ते २५ टक्क्यांच्या आसपास आहे. कोकणात होळी आणि गणपतीला दिवा येथून मोठ्या संख्याने नोकरदार गावी जात असतात. या कोरोना संसर्गानंतर २०२० मध्ये कोकणात प्रवेश बंदी होती. त्यामुळे कोकणात फार कमी संख्येने लोक गेले होते. यंदा कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने 'आरटीपीसीआर' चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र स्वतःजवळ बाळगणे आले आहे.

हेही वाचा: काँग्रेस, शिवसेना देणार दुसरा पर्याय

बंधनकारक करण्यात मतांची काळजी ८०० रुपये हा दर सामान्यांना परवडणार नसल्याचे लक्षात येताच शिवसेना, भाजप आणि मनसेच्या वतीने कमी पैशांत चाचणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या यावरून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. दिव्यातील व्हाट्सअप समूहावर काहींनी पक्षाला मतांची गरज आहे, त्यामुळे सामान्यांची काळजी करण्याची पक्षांना गरज निर्माण झाल्याचे प्रतिक्रिया दिली.

loading image
go to top