Diwali Shopping
ESakal
मुंबई
Diwali Festival: बाजारपेठा गजबजल्या! दिवाळीच्या खरेदीची लगबग; आज गर्दी वाढणार
Diwali Shopping: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यानिमित्त खरेदीची लगबग सुरू झाली असून रविवारी सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
प्रभादेवी : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण समजले जाणाऱ्या दादरमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. शनिवारी (ता. ११) दादर मार्केट नागरिकांनी गजबजून गेले होते.