esakal | मुंबईकर प्रचंड टेन्शनमध्ये, सर्व्हेतून मुंबईकरांबाबत धक्कादायक बाब झाली उघड
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकर प्रचंड टेन्शनमध्ये, सर्व्हेतून मुंबईकरांबाबत धक्कादायक बाब झाली उघड

या सर्वेमधून समोर येणारं भीषण वास्तव म्हणजे ६५ टक्के लोकांना मध्यम ते तीव्र स्वरुपाचा तणाव आहे.

मुंबईकर प्रचंड टेन्शनमध्ये, सर्व्हेतून मुंबईकरांबाबत धक्कादायक बाब झाली उघड

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झालाय. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंतही म्हणजेच तब्बल पाच महिन्यांच्या शेवटीही राज्यातील लॉकडाऊन पूर्णपणे उठलेला नाही. मात्र या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांचं आर्थिक गणित चांगलंच बिघडलंय. लॉकडाऊनमुळे कंपन्यांना झालेलं नुकसान आणि त्यानंतर झालेली कर्मचारी कपात. यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आलीये. काहींच्या नोकऱ्या गेल्यात, तर अनेकांची पगार कपात झालीये. अनेक ठिकाणी पगार कपात अजूनही सुरु आहे. अशात नोकरी टिकवणे, महिन्याचा घरखर्च चालवणे, EMI भरणे अत्यंत कठीण झालंय. 

मोठी बातमी : सुशांत सिंह प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेला संदीप सिंह फडणवीसांसोबत होता एकाच व्यासपीठावर, सचिन सावंतांचं ट्विट
 

सर्व्हेतून काय-काय गोष्टी समोर आल्या आल्यात समोर : 

  • लॉकडाऊन किती दिवस चालणार हा सर्वात मोठा चिंतेचा मुद्दा 
  • पाचपैकी दोन भारतीय कर्मचारी वेतन कपातीचा सामना करत आहेत.
  • लॉकडाऊनच्या सुरुवातीला ३३ टक्के लोक प्रचंड तणावात होते. हा आकडा जून अखेरपर्यंत ५५.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला
  • लॉकडाऊनमुळे ३८ टक्के लोकांचा राग आणि चिडचिड वाढली आहे
  • सध्याच्या घडीला ६५ टक्के लोकांना मध्यम ते तीव्र स्वरुपाचा तणाव आहे. ४१ टक्के जणांची चिंता वाढली आहे.

मोठी बातमी : परीक्षांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

या सर्व्हेक्षणात नागरिकांवर किती प्रमाणात तणाव आहे आणि कोणत्या शहरातील नागरिक सर्वाधिक तणावात आहेत याबाबततही माहिती देण्यात आलीये. एप्रिल ते जून महिन्यांच्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये ८३९६ भारतीयांवर अभ्यास करण्यात आला. या सर्व्हेक्षणात मुंबई सर्वाधिक तणावात असल्याचं स्पष्ट झालंय. लॉकडाऊनमुळे सर्वचजण तणावात आहेत.

या सर्वेमधून समोर येणारं भीषण वास्तव म्हणजे ६५ टक्के लोकांना मध्यम ते तीव्र स्वरुपाचा तणाव आहे. 

मुंबईत तब्बल ४८ टक्के तणाव वाढलाय, उर्वरित देशाच्या तुलनेत हा आकडा प्रचंड मोठा आहे. इतर शहरांबाबत बोलायचं झाल्यास, बंगळुरूमध्ये तणावाचं प्रमाण ३७ टक्के वाढलं आहे. हेच प्रमाण दिल्लीमध्ये ३५ टक्के वाढलं आहे. चेन्नईमध्ये तणावाचं प्रमाण२३ टक्के वाढलं आहे. म्हणजेच इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक म्हणजेच जवळपास ५० टक्के अधिक तणाव वाढलाय. 

Your Dost  (युअर दोस्त) या ऑनलाइन मेंटल हेल्थ प्लॅटफॉर्मकडून हे सर्वेक्षण करण्यात आलं. 
 
 

loading image
go to top