esakal | परीक्षांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

आजच माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचा आदर सर्वांनाच करावा लागेल.

परीक्षांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकार विरुद्ध UGC असा सामना महाराष्ट्र आणि देशातील काही इतर राज्यांमध्ये रंगला होता. महाराष्ट्रात या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण देखील तापलं होतं. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. दरम्यान आज सुप्रीम कोर्टाने शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा घ्याव्या की नाही यावर आपला निर्णय दिलाय. त्यामुळे आता UGC विरद्ध राज्य विविध सरकारं या विषयावर पडदा पडलाय. विना परीक्षा घेता विद्यार्थ्यांना परीक्षा प्रमोट करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करावी लागणार आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे.

मोठी बातमी - मध्य रेल्वे मार्गावर अखेर QR कोड स्कॅनिंग सुरू; 1 लाख 80 हजार 400 प्रवाशांना QR कोड वितरीत 

उदय सामंत मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हणालेत की,  आजच माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचा आदर सर्वांनाच करावा लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे निकाल देताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने २ टप्प्यात निकाल दिलेला आहे. यामध्ये, एकतर असं सांगितलंय की ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्यायच्या ज्या UGC ने गाईडलाईन्स दिलेल्या होत्या त्या महाराष्ट्र शासनाला किंवा कोणत्याही शासनाला बंधनकारक नाही. आता डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने पुन्हा एकदा  विचार करून UGC ला रेकमेंड करावं की, आम्ही कधी परीक्षा घेणार आहोत, कशा घेणार किंवा त्यावर मार्ग कसा काढणार आहोत. अशी एक मुभा सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने दुसरं असं म्हंटल आहे की, परीक्षा या रद्द करू शकत नाही, त्या घ्यायला लागतील. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करून आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा आदर करून त्यानून महाराष्ट्र शासनाला मार्ग काढायचा आहे. मार्ग काढत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्यचं हीत ही महाराष्ट्र सरकारची प्राथमिकता असेल. म्हणूनच निकालाचा पूर्ण अभ्यास झाल्यावर यावर सविस्तर बोलणं उचित ठरेल.

मोठी बातमी - मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी, नक्की वाचा

दरम्यान सुपरम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्य सरकार याबाबत कशी आणि कोणती पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

first reaction of uday samant after verdict of supreme court about final year exams 

loading image
go to top