नाहितर निवडणूकीमध्ये नागरीक उत्तर देतील - कल्याण सामाजिक संघटना

नाहितर निवडणूकीमध्ये नागरीक उत्तर देतील - कल्याण सामाजिक संघटना

कल्याण - मुंबई प्रमाणे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि कल्याण डोंबिवली कराकडून सर्वात जास्त मालमत्ता कर. असे का? आम्हाला ही सवलत द्या नाही तर आगामी निवडणूकीमध्ये नागरीक उत्तर देतील असा इशारा कल्याण पूर्व मधील विकासिनी सामाजिक संघटनेने दिला आहे. 

कल्याण डोंबिवलीकरांनी शिवसेना भाजपा युतीला अनेक वर्षे पालिकेच्या तिजोरीची चावी दिली असताना मुंबई महानगर पालिका हद्दीत राहणाऱ्या नागरीकांना 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, या सेना भाजपा वाल्यांचे कल्याण डोंबिवली करांनी काय घोडे मारले आहे. आम्हाला ही सवलत द्यावी अशी मागणी कल्याण विकासिनी या सामाजिक संघटनेने केली आहे. 

राज्यातील सर्व महानगर पालिकेपेक्षा जास्त कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत मालमत्ता कर जास्त असून पालिका काय सुविधा देत हा प्रश्न निर्माण झाला आहे. जास्त मालमत्ता कर असताना कल्याण डोंबिवली मधील नागरिक मागील अनेक वर्षे नागरिक सेना भाजपाला मतदान करत असून त्यांना सुविधा पासून वंचीत राहिला आहे. 

आज मुंबईकराना मालमत्ता करात सूट देता येते तर कल्याण डोंबिवली मध्ये का नाही ? कल्याण डोंबिवली 

महानगर पालिकेत
मध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता आहे ना ? कल्याण डोंबिवली सहित राज्यातील अनेक महानगर पालिका मध्ये शिवसेना भाजपाची सत्ता असून आम्हाला वेगळी वागणूक का ? कल्याण डोंबिवली करांनी शिवसेना भाजपाचे काय घोडे मारले आहे, याचे उत्तर अपेक्षित असून आम्हाला ही सवलत देऊन आमची नुकसान भरपाई द्या अन्यथा आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला मतदान मधून उत्तर देईल असा इशारा कल्याण पूर्व मधील सामाजिक संघटना विकासिनी अध्यक्ष ऍड उदय रसाळ यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com