आलिया भटला न्यायालयाचा दिलासा, 'त्या' सिनेमाच्या शूटिंगचा मार्ग मोकळा

सुनीता महामुणकर
Sunday, 21 February 2021

गंगुबाई यांचे दत्तक पुत्र असल्याचा दावा करणाऱ्या  बाबुजी शहा यांनी न्यायालयात अर्ज केला होता. संजय लीला भन्साळी याची निर्मिती असून आलिया भट मुख्य भूमिकेत आहे.

मुंबई: अभिनेत्री आलिया भटचा आगामी सिनेमा गंगुबाई काठीयावाडीच्या प्रदर्शनाला विरोध करणारा दावा शहर दिवाणी न्यायालयाने नुकताच नामंजूर केला आहे. 

माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या हुसैन जैदी यांच्या पुस्तकावरुन हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याची निर्मिती असून आलिया भट मुख्य भूमिकेत आहे. गंगुबाई यांचे दत्तक पुत्र असल्याचा दावा करणाऱ्या  बाबुजी शहा यांनी न्यायालयात अर्ज केला होता. 

गुजरात मधून मुंबईत आलेल्या गंगुबाई यांच्यावर हा कथित सिनेमा आहे. तसेच त्यांनी देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी भरीव काम केले आहे. झैदी यांचे पुस्तक  2011 मध्ये आले आहे. मात्र त्यावर आता शहा यांनी आक्षेप घेतला आहे. पुस्तकात चुकीची माहिती असून लेखकाने तिच्या वारसांकडून सत्य परिस्थिती जाणून घेतली नाही, असा दावा शहा यांनी केला होता. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र एवढ्या वर्षानंतर शहा यांनी दावा करण्याऐवजी यापूर्वीच करायला हवा होता. तसेच ते गंगुबाई यांचे दत्तक पुत्र आहेत याचा कागदोपत्री पुरावा त्यांनी न्यायालयात दाखल केला नाही, असा युक्तिवाद भन्साळी यांच्या वतीने करण्यात आला. न्या आर एम सद्राणी यांनी दावा नामंजूर केला.

हेही वाचा- अखेर उद्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांच्या हाती 

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

City civil court rejected claim opposing screening Alia Bhatt film Gangubai Kathiawadi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: City civil court rejected claim opposing screening Alia Bhatt film Gangubai Kathiawadi