मालमत्ता कर भरा अन्यथा थेट लिलाव होणार; BMC चा कर चुकवणाऱ्यांना इशारा

मालमत्ता कर भरा अन्यथा थेट लिलाव होणार; BMC चा कर चुकवणाऱ्यांना इशारा

मुंबई : मालमत्ता कर थकविणाऱ्यांची मालमत्ता जप्त करुन लिलावातून कर वसुलीचे अधिकार मिळाल्यानंतर महानगर पालिका आता आक्रमक झाली आहे.प्रत्येक प्रभागातील 100 या प्रमाणे 2400 मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांंच्या मालमत्ता जप्त करुन थेट लिलाव करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.

मुंबई महानगर पालिकेची मालमत्ता कराची तब्बल 15 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.तर,यंदा 6700 कोटी रुपयांचा थकबाकीसह वार्षिक मालमत्ता कर वसुल करण्याचे ध्येय महानगर पालिकेने ठेवले होते.मात्र,आता कोविडमुळे हे ध्येय 4500 पर्यंत खाली आणण्यात आले आहे.या नियमीत वसुली बरोबरच थकबाकी दारांनावर आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.त्यासाठी प्रत्येक प्रभागातील 100 या प्रमाणे 24 प्रभागातील 2400 प्रमुख थकबाकीदारांची यादी महानगर पालिकेने तयार केली आहे.‘या थकबाकीदारांना नोटीस पाठवून त्यांनी मुदतीत कर न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करुन लिलाव करण्यात येणार आहे’.असे सहाय्यक आयुक्त डॉ.संगिता हसनाळे यांनी सांगितले.
अशा 48 थकबाकीदारांवर प्राथमिक कारवाई सुरुही करण्यात आली असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘न्यायालयात प्रलंबीत नसलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी यावेळी कठोर पाऊले उचलण्यात येणार आहेत.मालमत्तांचा लिलाव हा त्याचा भाग आहे’.असे अतिरीक्त आयुक्त पी.वेलारसु यांनी सांगितले.मालमत्तांचा लिलाव करताना मालमत्तेची किंमत ठरविण्यासाठी तज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे.त्यासाठीही महानगर पालिकेने निवीदा मागवल्या आहेत.आता पर्यंत महानगर पालिका विज पाणी तोडून कारवाई करत होते.मात्र,अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

कायद्यातही सुधारणा
महानगर पालिकेने 2015 पासून भांडवली मुल्यावर आधारीत मालमत्ता कर लागू केला.यात रेडिरेकनरच्या दरानुसार मालमत्ता कर वसुल केला जातो.हा कायदा तयार करताना थकबाकीदारांच्या मालमत्तांचे लिलाव करण्याचे अधिकार गोठविण्यात आले होते.मात्र,गेल्या महिन्यात प्रशासनाने या अधिनियमात सुधारणा करुन हे अधिकार परत मिळवले आहेत.

2 हजार कोटींची वसुली
8 एप्रिल पर्यंत मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत आहे.तो पर्यंत 2 हजार 78 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.तर,उर्वरीत 2 हजार 400 कोटीहून अधिक वसुली व्हायची आहे.पण,वसुलीचे ध्येय पुर्ण करु असे उपायुक्त सुनिल धामणे यांनी सांगितले.यंदा कर भरण्यासाठी विविध पर्यायही उपलब्ध करुन दिले आहेत.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

city marathi news BMC property tax evaders auction.live latest update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com