निविदा न काढताच जुन्याच कंत्राटदारांना नाले सफाईचे काम; BMCच्या स्थायी समितीत गदारोळाची शक्यता

समीर सुर्वे
Monday, 11 January 2021

काेविडमुळे नालेसफाईसाठी कंत्राटदार मिळत नसल्याने महानगर पालिकेने गेल्या वर्षीच्या ठेेकेदारांना हे काम देण्याचा निर्णय घेतला आहे.महानगर पालिका यंदा पश्‍चिम उपनगरातील लहान नाल्याच्या साफईसाठी 47 कोटी 7 लाख रुपये खर्च करणार आहे

मुंबई : काेविडमुळे नालेसफाईसाठी कंत्राटदार मिळत नसल्याने महानगर पालिकेने गेल्या वर्षीच्या ठेेकेदारांना हे काम देण्याचा निर्णय घेतला आहे.महानगर पालिका यंदा पश्‍चिम उपनगरातील लहान नाल्याच्या साफईसाठी 47 कोटी 7 लाख रुपये खर्च करणार आहे.मात्र,कोविड निवीदा न काढता काम न देण्याच्या कारणावरुन आगामी स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ होण्याची शक्यता आहे.

2020-21 या वर्षासाठी पश्‍चिम उपनगरातील लहान नाल्याच्या सफाईसाठी महानगर पालिकेने फेब्रुवारी 2020 पासून चार वेळा निवीदा मागवल्या.मात्र,निवीदांना प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर पालिकेने अशासकीय संस्थांच्या कामागारांकडून नालेसफाई करुन घेण्याचा निर्णय घेतला.मात्र,त्यांनीही कोविडमुळे काम करण्यास असमर्थता दर्शवली.अखेरीस 2019-20 या वर्षातील नालेसफाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांकडूनच हे काम करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.मात्र,महापालिकेने गेल्या वर्षी 46 कोटी58 लाख रुपये खर्च केले होते.तर,यंदा 47 कोटी 7 लाख रुपये खर्च करणार आहे.प्रत्यक्षात गेल्या वर्षी पालिकेने या कामासाठी 43 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला होता.मात्र,विभागानुसार कंत्राटदारांनी 5 ते 22 टक्के दराने जादा निवीदा भरल्या होत्या.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

नाले सफाईसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव बुधवारी(ता.13) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला आहे.मात्र,निवीदा न देता कंत्राटदार नियुक्तीच्या प्रस्तावावरुन गदारोळ होण्याची शक्यता आहे. बोरीवली आर मध्ये प्रभागात गेल्या वर्षी पालिकेने 4 कोटी 71 लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला होता.तेव्हा सी.एन.लाधानी या कंत्राटदाराने 9.99 टक्के कमी दराने 4 कोटी 40 लाख रुपयात हे काम केले.मात्र,यंदा या प्रभागातील काम डी.बी.एन्टरप्रायझेस  या कंत्राटदाराला 4 कोटी 89 लाख रुपयात दिले आहे.

cleaning work to old contractors without tender by BMC

------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cleaning work to old contractors without tender by BMC