सरळगांव येथे स्वच्छता अभियानातून 122.88 टन कचरा साफ

नंदकिशोर मलबारी
रविवार, 13 मे 2018

एकूण 122.88 टन कचरा उचलण्यात आला. या स्वच्छता अभियानात 4168 श्रीसदस्य सहभागी झाले होते.     

सरळगांव (ठाणे) - डाॅ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने मुरबाड तालुक्यात स्वच्छता अभियान संपन्न झाले. या कार्यक्रमाअंतर्गत 122,88 टन कचरा उचलण्यात आला. या अभियानात तालुक्यातील 98 रस्ते व 82 कार्यालयांनी स्वच्छता करण्यात आली. एकूण 122.88 टन कचरा उचलण्यात आला. या स्वच्छता अभियानात 4168 श्रीसदस्य सहभागी झाले होते.     

पद्मश्री पुरस्कार सन्मानित स्वच्छता दूत आदरणीय श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने पुर्ण देणार व परदेशातही अनेक उपक्रम राबविले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान असे अनेक कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सकाळी तालुक्यात स्वच्छता अभियानाला सुरवात झाली. श्रीसदस्य यांच्या बरोबर ट्रॅक्टर, टेप्पो व टेम्पो रिक्षा असी 94 वाहाने कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य रस्ते व गावातील अंतर्गत रस्ते व सार्वजनिक कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Cleanliness campaign was implemented in Saralgaon