विद्यार्थ्यांकडून मुरबाड शहरात स्वच्छता अभियान

नंदकिशोर मलबारी  
रविवार, 30 सप्टेंबर 2018

सरळगांव (ठाणे) : स्वच्छ भारत विशेष अभियान अंतर्गत मुरबाड येथील एनटीटीएफ विद्यालयाच्या वतिने मुरबाड शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात 300 विद्यार्थ्यांबरोबरच नायब तहसीलदार हनुमंत जगताप सहभागी झाले होते.      
       
या कॉलेलच्या वतिने अनेक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे व सार्वजनिक ठिकाणी ही स्वच्छता राहावी या साठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे याची जाण विद्यार्थ्यांना यावी या दृष्टीने आज मुरबाड शहरातील पोलिस ठाणे, ग्रामिण रूग्णालय व मुरबाड एसटी बस स्थानकात 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ही स्वच्छता केली.

या वेळी रविवारची सुटी असतानाही या स्वच्छता मोहिमेत नायब तहसीलदार हनुमंत जगताप, बस स्थानकाचे प्रमुख मालचे, रविंद्र झूंझारराव या विद्यालयाचे शिक्षक मल्लिकार्जून निडभूत्ती, जॉबी पाल व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यां सहभागी झाले होते. 

Web Title: Cleanliness drive by students from Murbad city