प्राण्याची घाण साफ करा, अन्यथा दंड भरा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई - पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण केल्यास मालकाने साफ करावी; अन्यथा 500 रुपये दंड भरावा, अशी सक्त भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. डी प्रभागातील ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगाव चौपाटी, नेपीयन्सी रोड, पेडर रोड, चर्नीरोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, मलबार हिल या परिसरात प्रशासनाने कारवाईही सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत 16 जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. 

मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी 2006 नुसार पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर घाण केल्यास 500 रुपये दंडवसुलीची तरतूद आहे; मात्र या नियमाची आतापर्यंत कठोर अंमलबजावणी झाली नव्हती. प्राण्याच्या मलमुत्रातून लेप्टो पसरण्याची भीती पावसाळ्यात अधिक असते. रस्ते अस्वच्छ होत असल्याच्या तक्रारीही पालिकेकडे येत होत्या. त्याची दखल घेऊन पालिकेने डी प्रभागाच्या हद्दीत 32 जणांचे पथक तैनात केले. पहिल्या टप्प्यात प्राण्याच्या मालकांचे प्रबोधन करण्यात आले; मात्र त्यानंतरही श्‍वानाने घाण केल्यास मालकांकडून दंडवसुली करण्यात येणार आहे. दरम्यान, श्‍वानाने रस्त्यावर घाण केल्यास शिट लिफ्टरच्या साह्याने उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची पालिकेची परवानगी आहे. त्यामुळे पालिकेचा दंडही टाळता येऊ शकतो. 

"डी' प्रभागाच्या हद्दीत पाळीव श्‍वानांना रस्त्यावर फिरण्यास आणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पाळीव प्राण्यामुळे घाण होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबर अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी हे पथक तयार केले आहे. 
- विश्‍वास मोटे, सहायक आयुक्त, मुंबई पालिका 

Web Title: Clear the animal dirt otherwise the penalties