

Viral Fever Diseases due To Climate Changing
ESakal
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. कधी उन्हात तर कधी हलक्या सरींमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. सर्दी, खोकला आणि व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांसह शासकीय व महापालिकेच्या दवाखाने रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे.